राजकीय

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये महायुतीच्या कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Mahayutis corner meetings in Kolhapur


By nisha patil - 7/1/2026 1:25:13 PM
Share This News:



कोल्हापूर:-  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक

या कॉर्नर सभांना मंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव तसेच अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत, महायुती सरकारच्या माध्यमातून शहरात व प्रभागांमध्ये राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आगामी काळात कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी संबंधित प्रभागातील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या, अपेक्षा व सूचना नेत्यांसमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत विकासकामांना प्राधान्य देण्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी दिली.


कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये महायुतीच्या कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 42