बातम्या

कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Shiv

By nisha patil - 6/28/2025 11:22:22 PM
Share This News:

कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर | शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळाला असून १५,००० हून अधिक सदस्य नोंदणी अर्ज आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हे अभियान राबवले जात आहे. कोल्हापूरात आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.

या वेळी उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, प्रशांत साळुंखे, सौ. अमरजा पाटील, सुरेश माने, विजय जाधव, सौ. प्रीती अतिग्रे, सौ. राधिका पारखे, सौ. पूजा आरदांडे, सौ. सना अत्तार, फिरोज अत्तार आदी उपस्थित होते.

कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 138