शैक्षणिक
विकसित कृषी संकल्प अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 6/17/2025 9:28:13 PM
Share This News:
विकसित कृषी संकल्प अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ९० गावांमधील १८,००० शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.
शेतकऱ्यांना पिक उत्पादन, पशुपालन, प्रक्रिया, महिला आरोग्य, पोषण, शासकीय योजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.‘माहिती रथ’द्वारे बीज प्रक्रिया व जैविक उपचारांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला असून उत्पादन व उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याचा विश्वास वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. जयवंत जगताप यांनी व्यक्त केला.
विकसित कृषी संकल्प अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
|