बातम्या
स्पोर्ट्स सायन्स सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 8/30/2025 3:03:13 PM
Share This News:
स्पोर्ट्स सायन्स सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
ग्रामीण भागातील खेळाडूंनाही लाभ
कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे लोकार्पण व संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्रामुळे खेळाडूंना मानसिक स्वास्थ्य, दुखापत व्यवस्थापन, पुनर्वसन आणि तांत्रिक विश्लेषण यासाठी मोठे पाठबळ मिळणार असल्याचे आबिटकर म्हणाले.
मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, क्रीडा मार्गदर्शक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या केंद्रात बायोमेकॅनिकल टूल्स, फिटनेस विश्लेषण उपकरणे, रिकव्हरी सिस्टीम्स, आहारतज्ज्ञ व क्रीडा मानसशास्त्रज्ञ यांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंनाही जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळून त्यांची कार्यक्षमता वाढेल. यामुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
स्पोर्ट्स सायन्स सेंटरमुळे खेळाडूंना जागतिक यशाची संधी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|