शैक्षणिक
कोल्हापूरमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ
By nisha patil - 8/13/2025 5:16:32 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ
कोल्हापूर | समृद्ध क्रीडा परंपरा असलेल्या कोल्हापूरमध्ये डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठात ‘प्रीहॅब 121 इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स’च्या सहकार्याने स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी माहिती पुस्तिकेचे अनावरण करून पदव्युत्तर डिप्लोमा व चार प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची घोषणा केली.
नवीन अभ्यासक्रमांत स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, इन्ज्युरी रिहॅबिलिटेशन, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, अॅथलीट परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन व फिटनेस मॅनेजमेंटचा समावेश असून, क्रीडा प्रशासन, इव्हेंट मॅनेजमेंट व स्पोर्ट्स मार्केटिंगमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील.
कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाचे क्रीडा विज्ञान शिक्षण उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. ‘प्रीहॅब 121’चे डॉ. लुकमान शेख यांनी उद्योगाभिमुख शिक्षणातून नोकरीबरोबर स्टार्टअप संधी निर्माण होतील, असे नमूद केले.
कार्यक्रमाला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कोल्हापूरमध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ
|