खेळ

Sports news....दक्षिण कोरियातील जागतिक तायक्वॅान्डो एक्सपोमध्ये कोल्हापूरच्या जेएसटीएआरसी संघाची सहभागासाठी निवड

Sports news kolhapur


By nisha patil - 10/7/2025 12:06:14 AM
Share This News:



दक्षिण कोरियातील जागतिक तायक्वॅान्डो एक्सपोमध्ये कोल्हापूरच्या जेएसटीएआरसी संघाची सहभागासाठी निवड


कोल्हापूर | तारा न्यूज प्रतिनिधी कोल्हापूरातील जेएसटीएआरसी (JSTARC) या प्रतिष्ठित तायक्वॅान्डो प्रशिक्षण संस्थेचा संघ येत्या १७ ते २२ जुलै २०२५ दरम्यान दक्षिण कोरियात होणाऱ्या १८व्या जागतिक तायक्वॅान्डो कल्चरल एक्सपो २०२५ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.



या संस्थेच्या वार्षिक "कोरियाफेस्ट" उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणासह जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाते. यावर्षी सुदिक्षा पिसे, सौ. संपदा पिसे आणि कु. आयुष आडनाईक हे विद्यार्थी कोल्हापूर शाखेचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोरियात रवाना झाले आहेत.



ही स्पर्धा तायक्वॅान्डो वॉन, मुजु पार्क, जलाबोकदो राज्य या जगप्रसिद्ध क्रीडा संकुलात पार पडणार असून, यामध्ये सहभागी खेळाडूंना फाईट, पुमसे, स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा या तायक्वॅान्डोतील विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.



तसेच हा संघ कोरियामधील जागतिक तायक्वॅान्डो मुख्यालय ‘कुक्कीवॉन’ या प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्रालाही भेट देणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाचे ज्ञान आणि अनुभव मिळवण्याची अनोखी संधी या कोल्हापूरकर विद्यार्थ्यांना लाभणार आहे.



या संपूर्ण मोहिमेसाठी जेएसटीएआरसीचे संस्थापक आणि तायक्वॅान्डो तज्ज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या संघास तारा न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा!


Sports news...दक्षिण कोरियातील जागतिक तायक्वॅान्डो एक्सपोमध्ये कोल्हापूरच्या जेएसटीएआरसी संघाची सहभागासाठी निवड
Total Views: 146