बातम्या
कोल्हापुरातून स्टार एअरवेजची हैदराबाद व बेंगलोरसाठी नवी विमानसेवा सुरू
By nisha patil - 4/29/2025 9:38:06 PM
Share This News:
कोल्हापुरातून स्टार एअरवेजची हैदराबाद व बेंगलोरसाठी नवी विमानसेवा सुरू
कोल्हापूर विमानतळावरून स्टार एअरवेजकडून आता बेंगलोर व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होत आहे. १५ मेपासून ही सेवा उपलब्ध होणार असून, हैदराबादसाठी मंगळवार व बुधवार आणि बेंगलोरसाठी मंगळवार, बुधवार व रविवार असे तीन दिवस उड्डाण होणार आहे.
ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापुरातील आयटी, वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे ही सेवा सुरू झाली असून, कोल्हापूरच्या हवाई सेवेचा मोठा विस्तार होत
आहे.
कोल्हापुरातून स्टार एअरवेजची हैदराबाद व बेंगलोरसाठी नवी विमानसेवा सुरू
|