बातम्या

देवकर पाणंद–कळंबा रस्त्याचे काम सुरू करा – रहिवाशांचे निवेदन

Start work on Deokar Panand Kalamba road


By nisha patil - 9/23/2025 5:57:53 PM
Share This News:



देवकर पाणंद–कळंबा रस्त्याचे काम सुरू करा – रहिवाशांचे निवेदन

निकृष्ट कामाचा आक्षेप चुकीचा; दर्जा तपासून काम सुरू ठेवावे – नागरिक

कोल्हापूरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याच्या कामात अडथळे आल्याने स्थानिक रहिवाशांनी महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन दिले. आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून सुरू झालेले हे काम पावसामुळे थांबले होते, त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी दर्जावर आक्षेप घेत काम बंद पाडले.

मात्र नागरिकांनी दर्जाबाबत आपण सतर्क असल्याचे सांगत काम तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. भाजप मंडल अध्यक्ष विनय खोपडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह अनेक नागरिक सहभागी होते.


देवकर पाणंद–कळंबा रस्त्याचे काम सुरू करा – रहिवाशांचे निवेदन
Total Views: 65