विशेष बातम्या

प्रा. एल. डी. थोरात यांना “राज्यस्तरीय गरुड झेप” पुरस्कार — शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांच्या कार्याचा गौरव!

State Level Garuda Zep


By nisha patil - 10/29/2025 5:53:46 PM
Share This News:



प्रा. एल. डी. थोरात यांना “राज्यस्तरीय गरुड झेप” पुरस्कार — शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांच्या कार्याचा गौरव!

कोल्हापूर (प्रतिनिधी): गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ईगल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्कार – 2025” चाटे शिक्षण समूह, कोल्हापूरचे सरव्यवस्थापक प्रा. एल. डी. थोरात यांना जाहीर झाला आहे.

सदर पुरस्कार प्रा. थोरात यांना त्यांच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि समर्पित कार्याबद्दल जाहीर करण्यात आला असल्याची माहिती ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी दिली.

प्रा. थोरात गेली 25 वर्षे चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर कार्यालयात कार्यरत आहेत. या काळात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे सर्वांगीण घडविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानशैलीमुळे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत.

या सन्मानाबद्दल चाटे परिवारातील असंख्य आजी-माजी विद्यार्थी, पालक, सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. थोरात यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

सदर पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉक्टर अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज, आष्टा येथे संपन्न होणार आहे.


प्रा. एल. डी. थोरात यांना “राज्यस्तरीय गरुड झेप” पुरस्कार — शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांच्या कार्याचा गौरव!
Total Views: 133