राजकीय

राज्यातील निवडणुकांची घोषणा आज? दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद!

State elections announcement today


By nisha patil - 4/11/2025 1:31:01 PM
Share This News:



राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे! राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोर्टाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका पूर्ण करायच्या आहेत. त्यानुसार आयोगाकडून तयारी जोमात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात घेण्यात येऊ शकतात —
पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती,
दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या,
तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये मतदानाची शक्यता व्यक्त केली जात असून, दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये आणि तिसरा जानेवारीत पार पडेल, असा अंदाज आहे.

निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.
सर्वांच्या नजरा आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे लागल्या आहेत!


राज्यातील निवडणुकांची घोषणा आज? दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद!
Total Views: 41