बातम्या

मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

State government decides to withdraw


By nisha patil - 9/13/2025 3:44:00 PM
Share This News:



मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल न झालेल्या गुन्ह्यांना माफी दिली जाणार आहे.

या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांवरील हजारो खटले संपुष्टात येणार असून, आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश सरकारने दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनाविरोधात AMY फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुट्टीच्या दिवशी तातडीची सुनावणी घेण्यात आली होती.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले गेले होते. आता ते गुन्हे मागे घेतले जाणार असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Total Views: 120