बातम्या
*भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे २७ सप्टेंबरला राज्यस्तरीय आक्रोश महामोर्चा
By nisha patil - 9/24/2026 8:58:08 PM
Share This News:
*भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे २७ सप्टेंबरला राज्यस्तरीय आक्रोश महामोर्चा
आजरा(हसन तकीलदार):- विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार दि.27 सप्टेंबर 2026 रोजी राज्यस्तरीय आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी 11:00 वाजता क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर असा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पत्रकातून देण्यात आली आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून इ.व्ही.एम.हटवून बॅलेट पेपर लागू करणे, नीट परीक्षा घेणाऱ्या एन. टी. ए.ची मान्यता रद्द करणे, सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करणे, शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण थांबवणे आणि एन इ पी -2020 रद्द करून सुधारित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक धोरण लागू करणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविणे, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करणे, निकालानंतर नियुक्ती प्रक्रिया जलद पूर्ण करणे, पी इ एस संस्थांशी संबंधित महाविद्यालये व वसतिगृहांची दुरुस्ती करणे, ओ बी सी जातनिहाय जनगणना करणे, शिक्षक भरती नियमित करणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत वितरित करणे आदी मागण्यांचाही पत्रकात समावेश आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांशी संबंधित शासन निर्णय रद्द करून आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणांची तात्काळ चौकशी करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षण, रोजगार आणि शैक्षणिक हक्कांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
“विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रचारक हर्षवर्धन कांबळे यांनी केले.
*भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे २७ सप्टेंबरला राज्यस्तरीय आक्रोश महामोर्चा
|