विशेष बातम्या
गुणवंत अधिकारी म्हणून श्री. मोहन दाभाडे यांचा राज्यस्तरीय सन्मान
By nisha patil - 5/28/2025 5:07:55 PM
Share This News:
गुणवंत अधिकारी म्हणून श्री. मोहन दाभाडे यांचा राज्यस्तरीय सन्मान
पंचायत राज अभियानात मंत्रालयीन अधिकारी म्हणून चमकदार कामगिरी
पन्हाळा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी श्री. मोहन हिंदूराव दाभाडे यांनी प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामांमध्ये दिलेल्या अत्युत्कृष्ट योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत त्यांना "यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४" अंतर्गत राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी/कर्मचारी सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
सध्या श्री. दाभाडे हे ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकुशलतेने मंत्रालयातही प्रभावी छाप पाडली आहे. पन्हाळा तालुक्यातील कृषी विकास, शेतकरी संवाद, योजनांची अंमलबजावणी तसेच गावपातळीवरील लोकसहभाग वाढवण्याच्या उपक्रमांत त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली.
या सन्मानाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकास क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून, श्री. दाभाडे यांचे कार्य ग्रामीण भागात नवा विकासदृष्टीकोन घेऊन येत असल्याचे मत स्थानिक प्रशासन व सहकाऱ्यांनी व्यक्त केले.
गुणवंत अधिकारी म्हणून श्री. मोहन दाभाडे यांचा राज्यस्तरीय सन्मान
|