बातम्या
उचगाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
By nisha patil - 4/17/2025 4:23:41 PM
Share This News:
उचगाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
बौद्ध व बहुजन समाजावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी): उजगाव येथे बौद्ध समाज आणि बहुजन समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या वेळी सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. निवेदनाद्वारे प्रशासनाकडे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी प्रशासनास इशारा दिला की, जर लवकरात लवकर हल्लेखोरांवर ठोस कारवाई झाली नाही, तर यानंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थितांनी शांततेने परंतु ठामपणे आपली भूमिका मांडली. जिल्हा प्रशासनाने निवेदन स्वीकारले असून, या प्रकरणी चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
उचगाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
|