बातम्या
कोल्हापूरमध्ये पर्यटनस्थळी स्वच्छतागृहांची कमतरता उज्वल कोल्हापूर संघटनेचे निवेदन
By Administrator - 3/16/2026 3:48:24 PM
Share This News:
कोल्हापूरमध्ये पर्यटनस्थळी स्वच्छतागृहांची कमतरता उज्वल कोल्हापूर संघटनेचे निवेदन
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रमुख पर्यटनस्थळांवर तात्काळ स्वच्छतागृह उभारावीत, अशी मागणी उज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महापौर व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळे यांना देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोल्हापूर शहरात राज्य तसेच देशाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र शहरातील अनेक ठिकाणी पार्किंग परिसरात तसेच गर्दीच्या भागात स्वच्छतागृहांची व पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेषतः महिला पर्यटकांसाठी ही समस्या गंभीर बनत असून त्यामुळे शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे.यासाठी महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना करून प्रमुख पर्यटनस्थळांवर स्वच्छतागृह उभारावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः दसरा चौक रंकाळा टॉवर, बिंदू चौक, पापाची तिकटी, महाद्वार रोड, महालक्ष्मी मंदिर परिसर तसेच अन्य पर्यटनस्थळी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्यटनामुळे शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळत असल्याने पर्यटकांना मूलभूत सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी गणेश लाड, अजित पाटील अभिजित कदम, प्रसाद पवार, कुणाल शिंदे चेतन मोहिते राहूल शिंदे संकेत भोरे साजिद मुजावर जुनेद सय्यद आदी उपस्थित होते
कोल्हापूरमध्ये पर्यटनस्थळी स्वच्छतागृहांची कमतरता उज्वल कोल्हापूर संघटनेचे निवेदन
|