बातम्या
गोकुळ दूध संघातील खर्चावरील संशयास्पद कारभार चौकशीसाठी निवेदन
By nisha patil - 8/19/2025 6:40:27 PM
Share This News:
गोकुळ दूध संघातील खर्चावरील संशयास्पद कारभार चौकशीसाठी निवेदन
गोकुळ दूध संघातील ३ कोटी ७४ लाखांच्या खर्चावर संशय, चौकशीची मागणी
शेतकऱ्यांच्या पैशांची उधळपट्टी? कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी
गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक गोडबोले यांच्याकडे तब्बल ३ कोटी ७४ लाख रुपयांचे जाजम व घड्याळ भेटवस्तू खरेदी प्रकरण उघडकीस आल्याने वादंग निर्माण झाला आहे. यासंदर्भात यापूर्वी ६ ऑगस्ट २०२५ रोजी निवेदन देण्यात आले होते. मात्र १५ ऑगस्टपर्यंत खुलासा करणार असल्याचे जाहीर करूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने शेतकरी व संघटनेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
.jpg)
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, एवढ्या मोठ्या रकमेची खरेदी कोटेशनऐवजी निविदा काढून स्पर्धात्मक पद्धतीने व्हायला हवी होती. संचालक मंडळाला किती रकमेपर्यंत कोटेशनवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हे देखील स्पष्ट केले गेलेले नाही.
.jpg)
याशिवाय, पशुखाद्य घोटाळा व सहकुटुंब गोवा सहलीसाठी खर्च झालेल्या लाखो रुपयांचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्यास त्यावर कठोर कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याची व न्यायालयीन लढा देण्याची चेतावणीही देण्यात आली आहे.

गोकुळ दूध संघातील खर्चावरील संशयास्पद कारभार चौकशीसाठी निवेदन
|