ताज्या बातम्या
उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने औद्योगिक कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन
By nisha patil - 9/12/2025 2:57:21 PM
Share This News:
उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने औद्योगिक कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन
कोल्हापूर: औद्योगिक कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त मा. विशाल घोडके साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये प्रामुख्याने औद्योगिक कामगारांना २५ हजार महागाई भत्ता लागू करणे, केंद्र व राज्य वेतनातील तफावत दूर करणे तसेच MIDC परिसरातील कामगारांचे शोषण थांबवून त्यांना न्याय मिळवून देणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
संघटनेने कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी यावेळी केली.
यावेळी गणेश लाड, अजित पाटील, अभिजीत कदम, सुनील कदम हे उपस्थित होते.
उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने औद्योगिक कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन
|