बातम्या

सार्वजनिक गटारीतील विजेचे खांब हलवण्याबाबत निवेदन

Statement regarding moving electricity poles in public sewers


By Administrator - 5/3/2026 11:25:52 AM
Share This News:



सार्वजनिक गटारीतील विजेचे खांब हलवण्याबाबत निवेदन


आजरा(हसन तकीलदार) :- येथील चर्च गल्ली परिसरातील रहिवाशांनी सार्वजनिक गटारीमध्ये असलेले विद्युत खांब हलविण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या उपअभियंता, उपविभाग आजरा यांना निवेदन देण्यात आले आहे.
      चर्च गल्ली मागील आपटे कॉलनी, गट क्रमांक ३१७ परिसरात शेतरस्त्याच्या गटारीमध्ये विद्युत मंडळाचे वीज पोल उभे केलेली आहेत. या मार्गावर नवीन गटर बांधकाम व रस्त्याचे काम येत्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र सध्या असलेले पोल रस्ते व गटार बांधकामासाठी अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने ते तातडीने दुसऱ्या पर्यायी ठिकाणी बदल करून देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर रुजायला डिसोझा, आश्रम साबंरेकर, मोतीराम बार्देसकर, मिनीन डिसोझा, पावलू कुतिनो, उमेश शिंदे, तानाजी शिंदे, अंतोन कुतिनो, सीमा पोवार, महादेव जाधव तसेच इतर रहिवाशांच्या सह्या आहेत. संबंधित कामे सुरळीत पार पडण्यासाठी व नागरिकांना भविष्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पहाणी करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.


सार्वजनिक गटारीतील विजेचे खांब हलवण्याबाबत निवेदन
Total Views: 21