विशेष बातम्या

"शिवराज्याभिषेक बंद करणाऱ्याला 'नसबंदी' करा" – अमोल मिटकरींची जहरी टीका, नंतर ट्वीट डिलीट

Sterilize those who stop


By nisha patil - 1/6/2025 12:59:49 AM
Share This News:



"शिवराज्याभिषेक बंद करणाऱ्याला 'नसबंदी' करा" – अमोल मिटकरींची जहरी टीका, नंतर ट्वीट डिलीट


राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी शिवराज्याभिषेक दिनावरून वादग्रस्त वक्तव्य करत सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी नाव न घेता शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

"6 जूनचा शिवराज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे. एकदा कुणी पिसाळला तर त्याची तात्काळ नसबंदी करणे समयसंमत व समाज हिताचे आहे. तसे न केल्यास पिसाळलेली विकृती चावत सुटते. खबरदारी म्हणून सरकारने तात्काळ दखल घ्यावी," असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले होते.

या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना टॅगही केले होते. मात्र, या वादग्रस्त ट्वीटनंतर काही वेळातच मिटकरी यांनी आपले ट्वीट डिलीट केले आहे. सध्या त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्वीट उपलब्ध नाही.

या संपूर्ण प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, संभाजी भिडे यांच्या समर्थकांकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


"शिवराज्याभिषेक बंद करणाऱ्याला 'नसबंदी' करा" – अमोल मिटकरींची जहरी टीका, नंतर ट्वीट डिलीट
Total Views: 181