बातम्या

कोल्हापुरात बनावट 500 रुपयांच्या नोटांचा साठा जप्त; दोघांना अटक

Stock of fake Rs 500 notes seized in Kolhapur


By Administrator - 3/17/2026 2:54:15 PM
Share This News:



कोल्हापुरात बनावट 500 रुपयांच्या नोटांचा साठा जप्त; दोघांना अटक
 

कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वे स्टेशनसमोर बनावट 500 रुपयांच्या नोटा बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न उधळून लावत शाहूपुरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
 

गुरु राजेंद्र मेंगाने (वय 23, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) आणि राहुल प्रकाश किरुगडे (वय 33, रा. नाना पाटील नगर, माडा कॉलनी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता रेल्वे स्टेशनसमोर हे दोघे 500 रुपयांच्या नोटांसारख्या दिसणाऱ्या एकूण 262 बनावट नोटा (किंमत 1,31,000 रुपये) बाजारात विक्रीसाठी आणत होते. त्यावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.

 

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या नोटा कुठून आणल्या, छपाई कुठे झाली आणि आणखी किती नोटा बाजारात चलनात आणल्या आहेत का, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आकाश जाधव आणि सागर गुनवरे यांनी केली.


कोल्हापुरात बनावट 500 रुपयांच्या नोटांचा साठा जप्त; दोघांना अटक
Total Views: 27