बातम्या

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवा, अन्यथा टाळे ठोकू - शिवसेना

Stop the corrupt practices in the District Land Records Office

By nisha patil - 7/16/2025 7:31:19 PM
Share This News:

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवा, अन्यथा टाळे ठोकू - शिवसेना

कोल्हापूर, दि. १६ : जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अनियमित व भोंगळ कारभाराविरोधात शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. शहरप्रमुख रणजीत जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शेतकरी व सामान्य नागरिकांची मोजणी वर्षानुवर्षे प्रलंबित असताना धनदांडग्यांची मोजणी जलद गतीने केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय फेरफार, वारसा नोंद, व ऑनलाइन प्रणालीतील अडथळे यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. एजंटांची साखळी तयार होऊन लुट सुरू असल्याची तक्रारही करण्यात आली.

"हा भोंगळ कारभार थांबवला नाही, तर शिवसेना स्टाईलने कार्यालयाला टाळे ठोकू," असा इशाराही रणजीत जाधव यांनी दिला.

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार थांबवा, अन्यथा टाळे ठोकू - शिवसेना
Total Views: 67