विशेष बातम्या

स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवून जुने पोस्टपेड मीटर पुन्हा लावून द्या.- बहुजन मुक्ती पार्टी

Stop the process of installing smart


By nisha patil - 11/12/2025 5:40:51 PM
Share This News:



स्मार्ट  प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवून जुने पोस्टपेड मीटर पुन्हा लावून द्या.- बहुजन मुक्ती पार्टी
 
आजरा (हसन तकीलदार):- कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण  कंपनीच्या वतीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम हे लोकांना कोणतीही माहिती न देता सुरू केलेले असून, लोकांना अंधारात ठेवून कोणत्याही प्रकारचे काम करणे हे निश्चितच चुकीचे आहे. सदर स्मार्ट मीटरमुळे लोकांना अवाजवी बिल येत आहे, अशी तक्रार या अगोदर अनेक लोकांनी केलेली आहे याशिवाय त्या स्मार्ट मीटरचा खर्च देखील ग्राहकाकडून त्यांच्या संमतीशिवाय घेतला जात आहे

असे समजते जे की अतिशय चुकीचे आहे महाराष्ट्र विद्युत अधिनियम 2003 नुसार ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणते मीटर बसवायचे आहे याचा संपूर्ण अधिकार दिलेला आहे तरीही विद्युत विभागातील कर्मचारी लोकांना हे मीटर सक्तीचे असून ते बसवलेच पाहिजे असा गैर प्रचार करत आहेत याशिवाय ग्राहक घरी नसताना त्यांची संमती नसतानाही परस्पर नवीन मीटर बसवले जात आहेत.काही गावांमध्ये तर सरसकट सगळीकडे नवीन मीटर बसवण्याचे काम सुरू केलेले आहे, आणि काही ठिकाणी ज्यांचे जुने मीटर खराब झाले आहे, त्यांचे नवीन मीटर बसवताना थेट स्मार्ट मीटर बसवण्याचे काम कंपनीकडून करण्यात येत आहे.

सदर स्मार्ट मीटर ना लोकांचा तीव्र विरोध असूनही आपण मनमानी कारभार करत आहात,असे दिसून येते तरी आपण ही स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबून ग्राहकांना यासंबंधी माहिती देऊन त्यांची संमती असल्यास मगच स्मार्ट मीटर बसवण्यात यावेत ज्या ग्राहकांना विरोध असेल त्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची जबरदस्ती करण्यात येऊ नये यावर लक्ष घालून आपण आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना द्याव्यात.व स्मार्ट मीटर सरसकट बसवण्याचे काम बंद करावे व जुने मीटर आहे त्या परिस्थितीमध्ये चालू ठेवावे.असे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने महावीतरणला दिले आहे.
     

यात म्हटले आहे की, याशिवाय ज्या ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध आहे त्यांचे स्मार्ट मीटर बदलून जुने मीटर लावून द्यावं .ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आवाजवी बिल आले आहे त्यांचे बिल तात्काळ दुरुस्त करून मिळावे अशी सूचना आम्ही आपणास दिनांक 21-11-2025 रोजी निवेदन देऊन केली होती परंतु आज तागायत आमच्या मागणीची  दखल न घेतल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुढे आंदोलनाचा दुसरा टप्पा एकदिवसीय धरणे आंदोलन घेत आहोत.यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस आपण जबाबदार असाल याची दखल घ्यावी.
 

विद्युत महामंडळ यांनी दिलेलं मीटर जर काम करत नसेल किंवा ते खराब झालं असेल तर ते दुरुस्त करून विद्युत महामंडळ यांनी कोणताही अतिरिक्त चार्ज न घेता दुरुस्त करून देणे.
तसेच मौजे मसोली,तालुका आजरा,येथील जुना विद्युत खांब फेब्रुवारी 2023 मध्ये आहे त्या ठिकाणी न बसता संबंधित अधिकारी यांनी शहानिशा न करता ये जा करत असणाऱ्या वाटेत बसवलेला आहे तो बदलून इतर ठिकाणी बसवावा.

जुने मीटर डिजिटल मीटर होते त्यावेळी लाईटचा वापर नसताना जे बिल येत होते ते स्मार्ट मीटर बसवले नंतर लाईटचा वापर नसताना जादा बिल येत आहे, 610 रुपये ते 650 रुपये बिल येत होते.ब)2100 रुपये ते 2500 रुपये बिल येत आहे. (भटवाडी,आजरा) या प्रमुख मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर. उपविभागीय अभियंता,पुणे विभाग.तसेच आजरा पोलीस ठाणे यांनाही देण्यात आल्या आहेत


स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवून जुने पोस्टपेड मीटर पुन्हा लावून द्या.- बहुजन मुक्ती पार्टी
Total Views: 15