बातम्या
लक्ष्मीपुरीत भटक्या गाई-बैलांचा कहर; ३ जण गंभीर जखमी – महापालिकेच्या दिरंगाईवर सवाल
By Administrator - 6/27/2025 4:22:15 PM
Share This News:
लक्ष्मीपुरीत भटक्या गाई-बैलांचा कहर; ३ जण गंभीर जखमी – महापालिकेच्या दिरंगाईवर सवाल
लक्ष्मीपुरी परिसर कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी भागात भटक्या गाई-बैलांच्या प्रचंड उपद्रवाने रविवारी दुपारी मोठा हल्लकल्लोळ उडाला. या गोंधळात तीन नागरिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात भटक्या जनावरांची संख्या वाढली असून, महापालिका आणि संबंधित विभाग याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे या जनावरांचे मालक कोण आहेत, याचीही शहानिशा होत नाही.
नागरिकांनी आता एकच मागणी केली आहे –
"महापालिकेने आणि जनावरांचे मालकांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल."
लक्ष्मीपुरीत भटक्या गाई-बैलांचा कहर; ३ जण गंभीर जखमी – महापालिकेच्या दिरंगाईवर सवाल
|