बातम्या

कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; निर्बीजीकरण अपुरं, नागरिक त्रस्त

Stray dogs abound in Kolhapur


By nisha patil - 11/9/2025 4:50:11 PM
Share This News:



कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; निर्बीजीकरण अपुरं, नागरिक त्रस्त

कोल्हापूर शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी तब्बल ४ ते ५ हजार नवी कुत्री जन्म घेत असताना, केवळ अडीच हजारांचेच निर्बीजीकरण होत आहे. एका कुत्रीला सहा ते सात पिल्ले होत असल्याने संख्या वेगाने वाढतेय.

महापालिकेच्या दोन केंद्रांत रोज केवळ सहा ते सात कुत्र्यांचेच निर्बीजीकरण होत असल्याने ही केंद्रे अपुरी पडत आहेत. तज्ज्ञांच्या मते, शहरात किमान दहा केंद्रे सुरू करून दररोज शंभर कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाल्यास संख्या आटोक्यात येऊ शकते.

मात्र हा उपायही अंतिम नाही. निर्बीजीकरण झालेले कुत्रे चावतातच, त्यामुळे दहशत कायम आहे. कायदेशीर अडचणींमुळे पकडलेल्या कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडावे लागते, त्यामुळे प्रशासन हातबल झाले आहे. नागरिकांना रस्त्यावरून जाणेही धोक्याचे ठरू लागले आहे.


कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; निर्बीजीकरण अपुरं, नागरिक त्रस्त
Total Views: 168