बातम्या

*आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट

Stray dogs run rampant in Ajra


By nisha patil - 12/11/2026 1:59:35 PM
Share This News:



*आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट
 

*संघटनांच्या मागणीला केराची टोपली

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सातत्याने वाढतच असून विविध संघटनांनी याबाबत निवेदने दिली असली तरी यावर योग्य उपाययोजना आखण्यात प्रशासन हतबल असल्याचे चित्र दिसत आहे.
     

वाढते हॉटेल, चायनीज सेंटर, चिकन दुकाने यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे.शाळकरी मुलांच्या अंगावर धावून जाणे, पदचाऱ्यांचा चावा घेणे, शेळ्या, कोंबड्या, वासरावर हल्ला करणे, रस्त्यावर वाहनांच्या आडवे येणे असे भटक्या कुत्र्यांचे उपद्रव वाढतच चालले आहेत. आजरा आंबोली रोडवर कुत्र्यांचा कळपच्या कळप रस्त्यावर फिरताना दिसत आहे. चारचाकी आणि दोनचाकी वाहनांच्या आडवी गेल्यामुळे कित्येकदा अपघात घडले आहेत. यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सातत्याने वाढत असून नागरिक, पालक तसेच लहान मुलांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
   

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. प्राण्याबद्दल करुणा ठेवतानाच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्वाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ऍनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमाअंतर्गत कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी मोहीम राबविण्याचे तसेच खाद्य ठिकाणे निश्चित करणे गरजेचे असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.


*आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, प्रशासनाच्या मर्यादा स्पष्ट
Total Views: 78