बातम्या
कोल्हापुरात "रस्त्यावरचा सेलिब्रेशन" चक्क पोलिसांच्या तावडीत!
By nisha patil - 6/15/2025 1:36:11 AM
Share This News:
कोल्हापुरात "रस्त्यावरचा सेलिब्रेशन" चक्क पोलिसांच्या तावडीत!
कोल्हापूर, – रात्र झाली की रस्ते शांत होतात, पण काल रात्री कोल्हापूरच्या सदरबाजार परिसरातील एक रस्ता अचानक दिव्यांनी झळकला, गाजरांनी निनादला, आणि वाढदिवसाच्या जल्लोषाने भरून गेला. मात्र, हा उत्सव फार काळ टिकला नाही. कारण शांततेच्या रक्षकांनी – म्हणजेच शाहूपुरी पोलिसांनी – या ‘रस्ते रुंदीवरील सेलिब्रेशनला’ चक्क लगाम लावला!
शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके हे काल रात्री गस्त घालत असताना, त्यांना सदरबाजार परिसरात सार्वजनिक रस्त्यावर गोंगाट, गर्दी, आणि फुगे-केकसह वाढदिवस साजरा करताना काही तरुण आढळले.
ही होती ‘रात्रीच्या शांततेत गोंगाट करणाऱ्यांची’ यादी:
राहुल वाघमारे, ओमकार काळे, अभिजीत बुचडे, सनी कांबळे, फारूक शेख, असीफ मुजावर, अमीर शेख, विशाल भाले, कुणाल काटे, आयुष वकीलकर, ओमकार कोळी आणि सुमित कांबळे – हे सारे "सेलिब्रेशन योद्धे" थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले.
त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, पुढीलवेळी कोणी रस्त्यावर असा ‘उत्सवाचा स्फोट’ केला तर कारवाई अधिक कठोर असेल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.
रस्ते केकसाठी नाहीत, नियम पाळण्यासाठीच असतात हे विसरू नका!
—
तारा न्यूज | कोल्हापूर
कोल्हापुरात "रस्त्यावरचा सेलिब्रेशन" चक्क पोलिसांच्या तावडीत!
|