बातम्या
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई!
By nisha patil - 8/23/2025 4:30:46 PM
Share This News:
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई!
नसबंदी-लसीकरणानंतरच सोडले जातील मोकाट कुत्रे; सर्वोच्च न्यायालयाचा देशव्यापी आंदोलन
"नागरिकांनो, आता मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालण्यावर सर्वोच्च न्यायालयानेच अंकुश लावला आहे! ११ ऑगस्टच्या आदेशात बदल करत न्यायालयाने स्पष्ट केले आहे—कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण झाल्याशिवाय ते रस्त्यावर सोडले जाणार नाहीत. खाऊ घालण्यासाठी खास झोन ठरवले जाणार असून, जर कुणी ठरावीक जागांबाहेर प्रेमाचा अतिरेक केला, तर त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे. दिल्लीपुरते मर्यादित न राहता हा आदेश आता संपूर्ण देशभर लागू होणार आहे. डेहराडून आणि लखनौच्या यशस्वी उदाहरणांचा दाखला देत न्यायालयाने सांगितले—नसबंदीमुळेच नियंत्रण शक्य आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता मोकाट कुत्र्यांना नको तिथे खाऊ घालणाऱ्यांना शिक्षा टाळता येणार नाही!"
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई!
|