ताज्या बातम्या

विवेकानंद कॉलेजचे झोनल बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष व महिला संघाची दमदार घोडदौड;

Strong competition between mens and womens teams in the Vivekananda College


By nisha patil - 11/14/2025 2:46:40 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजचे झोनल बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष व महिला संघाची दमदार घोडदौड;

सुवर्ण कामगिरीने दिला अभिमान  

 कोल्हापूर 14: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाबाई डिफेन्स बॅडमिंटन अकॅडमी येथे घेण्यात आलेल्या कोल्हापूर झोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धे मध्ये विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाने सुवर्णपदकाची कमाई करून अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आष्टा येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटरझोनल महिला व पुरुष बॅडमिंटन स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले.

यशस्वी खेळाडूचे अभिनंदन

 यशस्वी खेळाडूला श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.


विवेकानंद कॉलेजचे झोनल बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष व महिला संघाची दमदार घोडदौड;
Total Views: 39