बातम्या

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा पन्हाळगडावर तीव्र निषेध!

Strong protest at Panhalgad against the attack on Praveen Gaikwad


By nisha patil - 7/16/2025 7:41:23 PM
Share This News:



प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा पन्हाळगडावर तीव्र निषेध!

 हा हल्ला केवळ व्यक्तीवर नाही, तर विचारांवर – पन्हाळ्यातून आक्रमक प्रतिक्रिया

 शहाबाज मुजावर सोलापूर अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळे वंगण फेकून आणि जीवे मारण्याची धमकी देत भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेचा तीव्र निषेध आज पन्हाळगडावर राम मंदिर बस स्थानक येथे नागरिक आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.

या वेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयोजित निषेध सभेत संघटनेचे अध्यक्ष भीमराव काशीद यांनी प्रवीणदादा यांच्यावर झालेला हल्ला लोकशाहीचा अपमान असल्याचे स्पष्ट केले.

जिजाऊ ब्रिगेडच्या मधुरा कुराडे यांनी सांगितले की, “हा हल्ला केवळ प्रवीणदादांवर नाही, तर बहुजन समाजाच्या विचारांवर आहे. प्रवीणदादा हे मराठा आरक्षण, युवकांच्या रोजगारासाठी आणि सामाजिक हक्कासाठी संघर्ष करत असताना अशा स्वरूपाचा हल्ला निषेधार्ह आहे.”

माजी नगरसेवक ॲड. रविंद्र तोरसे यांनी विचार लढाईनेच लढला पाहिजे असे सांगत आरोपीवर तात्काळ कडक कारवाईची मागणी केली.

या वेळी माजी नगराध्यक्ष, महिला कार्यकर्त्या,  पन्हाळागडावरील अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने हल्लेखोरावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली.


प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा पन्हाळगडावर तीव्र निषेध!
Total Views: 167