बातम्या
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कागलमध्ये शायना एन.सी. यांच्या प्रतिमेचे दहन न करता फोटो फाडून तीव्र निषेध!
By nisha patil - 11/19/2026 8:29:25 PM
Share This News:
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कागलमध्ये शायना एन.सी. यांच्या प्रतिमेचे दहन न करता फोटो फाडून तीव्र निषेध!
कागल प्रतिनिधी : अजित बोडके हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज कागल तालुका शिवसेनेच्या वतीने कागल शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शायना एन.सी. यांच्या छायाचित्राचे फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या प्रकाराबद्दल शिवसैनिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या छायाचित्राचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. या घटनेच्या निषेधार्थ कागल शहरात शिवसैनिकांनी एकत्र येत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनावेळी कागल तालुकाप्रमुख मा. अजित मोडेकर, विभागप्रमुख सावंता कांबळे, महिला शहर संघटिका सौ. दीपाली घोरपडे, तालुका संघटिका सौ. कांचन माने, शाखाप्रमुख विकास तोडकर, बापू एखंडे, वैभव आडके, श्रेयस मधाळे, राहुल कांबळे, संजय गाडेकर, वैभव मोडेकर, वैष्णव मोडेकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कागलमध्ये शायना एन.सी. यांच्या प्रतिमेचे दहन न करता फोटो फाडून तीव्र निषेध!
|