बातम्या

कोल्हापूर: ‘लव्ह जिहाद’विरोधात युवती-महिलांचा जोरदार आंदोलन

Strong protest by young women against Love Jihad


By nisha patil - 4/10/2025 5:28:57 PM
Share This News:



कोल्हापूर: ‘लव्ह जिहाद’विरोधात युवती-महिलांचा जोरदार आंदोलन

कोल्हापूर, 4 ऑक्टोबर – राज्यभरात असंख्य हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राचा बळी ठरत असल्याचे हिंदु जनजागृती समितीने सांगितले आहे. या गंभीर प्रकरणाला रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा संमत करण्याची मागणी पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे समितीच्या वतीने केली गेली.

आबीटकर यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत, कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. याच निवेदनाचे समान आश्वासन भाजपचे खा. धनंजय महाडिक, भाजपचे आ. अमल महाडिक आणि शिवसेना आ. राजेश क्षीरसागर यांनीही दिले.

‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी कृत्य नसून ते संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध असल्याचे समितीने स्पष्ट केले. यात खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतर, लैंगिक शोषण, वेश्या व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवी तस्करी, मानवी अवयवांची विक्री आणि आतंकवादी कारवायांत सहभाग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या युवती-महिलांनी हातात ‘मी ही माता दुर्गेचे रूप बनेन! – मै हूं दुर्गा’ असे संदेश असलेले फलक उभारले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित, हिंदुत्वनिष्ठ मनोजकुमार चौगुले, संजय माळी, दिलीप दळवी, घन:शामभाई पटेल, भाजपच्या महिला सरचिटणीस वंदनाताई बंबलवाड आणि प्रतिभा तावरे यांसह अनेक जण उपस्थित होते.


कोल्हापूर: ‘लव्ह जिहाद’विरोधात युवती-महिलांचा जोरदार आंदोलन
Total Views: 44