बातम्या

करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा

Strong support from resolution


By nisha patil - 12/10/2026 10:59:51 PM
Share This News:



करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा
              
नेतेमंडळींची नियोजनाची बैठक
         
विश्वास नारायण पाटील, राहुल पी. एन. पाटील, एस. आर. पाटील, अजित पाटील, प्रतापसिंह पाटील -कावणेकर यांची उपस्थिती

          
कोल्हापूर, दि. १२: करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भरभक्कम पाठिंबा आहे, असा विश्वास करवीर तालुक्यातील नेतेमंडळींनी व्यक्त केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजनाच्या बैठकीला आधी नेतेमंडळी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापुरात ही बैठक झाली. 

​        
उमेदवार असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. एन. पाटील म्हणाले, करवीर तालुक्यातील ठरावधारकांची संख्या सबंध जिल्ह्यात उच्चांकी आहे. एकूण ८६५ मतदार संख्या असलेल्या या तालुक्याने आम्हा सर्वांनाच नेहमीच खंबीर साथ दिली आहे. या निवडणुकीतही शेतकरी, दूध उत्पादक सभासद छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा देतील. 
         
​विश्वास नारायण पाटील (आबाजी) म्हणाले, गोकुळ दूध संघाचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या विचारांवरतीच आमची वाटचाल सुरू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतही करवीर तालुक्यातून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला ऐतिहासिक मताधिक्याची नोंद होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  
                 
उमेदवार एस. आर. पाटील म्हणाले, संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी उच्चांकी आणि ऐतिहासिक मताधिक्याने येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 
​              
उमेदवार प्रताप पाटील-कावणेकर म्हणाले, गोकुळ दूध संघ सबंध महाराष्ट्रात अग्रेसर आहेच. येत्या पाच वर्षांत गोकुळ दूध संघाला देशपातळीवर अग्रेसर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. या प्रयत्नांना सर्वसामान्य दूध उत्पादक सभासद निश्चितच साथ देतील. 
​                 
उमेदवार अजित पाटील-परीतेकर म्हणाले, महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीने एकजुटीची मोट बांधलेली आहे. दूध उत्पादक सभासदांनीही छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे.  


करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा
Total Views: 5