शैक्षणिक
शहाजी मध्ये विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 7/17/2025 3:11:38 PM
Share This News:
शहाजी मध्ये विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर:शहाजी महाविद्यालयातील कॉमर्स विभाग व IQAC (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) यांच्या संयुक्त विद्यमाने बी.कॉम. भाग-एकच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत "बी.कॉम. प्रवास : दिशा, तयारी व यशस्वी वाटचाल" या विषयावर डॉ. एन. एल. कदम, प्राचार्य, डी. आर. माने कॉलेज, कागल यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. संतोष कांबळे यांनी केले. त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत कॉमर्स विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आणि या कार्यक्रमाच्या उद्दिष्टांविषयी उपस्थितांना अवगत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सौ. अस्मिता इनामदार यांनी करून दिला.
आपल्या व्याख्यानात डॉ. एन. एल. कदम सरांनी बी.कॉम. भाग-एकच्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे शैक्षणिक व व्यावसायिक महत्त्व समजावून सांगितले. बी.कॉम. नंतर उपलब्ध संधी, त्यासाठीची तयारी, तसेच वाणिज्य शिक्षणाचा यशस्वी करिअरसाठी कसाब उपयोग होतो, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या कौशल्यांचा शोध घेऊन त्यांचा उपयोग आपल्या करिअरमध्ये करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांना बी.कॉम. हा अभ्यासक्रम समजून घेत गंभीरतेने पूर्ण करण्याचे आवाहन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ. एम. आय. मुजावर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. ए. ए. कोल्हापुरे यांनी मानले.
या कार्यक्रमास IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले.
शहाजी मध्ये विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम संपन्न
|