ताज्या बातम्या
कुरुकलीत भीषण अपघात विद्यार्थिनी ठार
By nisha patil - 7/25/2025 3:31:46 PM
Share This News:
कुरुकलीत भीषण अपघात विद्यार्थिनी ठार
तिघी गंभीर जखमी, अल्पवयीन चालकाला नागरिकांनी पकडलं
कुरुकली (ता. करवीर) : गुरुवारी दुपारी कुरुकली येथील एस.टी. बसस्थानकावर वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात भरधाव कार घुसली. या अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८, रा. कौलव) या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अस्मिता पाटील, श्रावणी सरनोबत व श्रेया डोंगळे या तिघी गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर कारचालकाने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तो अल्पवयीन असून राशिवडे येथील रहिवासी आहे. सर्व जखमींवर सीपीआर व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुरुकलीत भीषण अपघात विद्यार्थिनी ठार
|