बातम्या
वाचन प्रेरणा दिनादिवशी विद्यार्थ्यांचे अभिवाचन ; पंत वालावलकर हायस्कूलचा उपक्रम
By nisha patil - 10/16/2026 3:20:57 PM
Share This News:
वाचन प्रेरणा दिनादिवशी विद्यार्थ्यांचे अभिवाचन ; पंत वालावलकर हायस्कूलचा उपक्रम
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांतारामपंत वालावलकर हायस्कूलमध्ये मिसाईल मॅन डॉक्टर ए .पी .जे . अब्दुल कलाम यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथपाल गुरुप्रसाद पाटील यांनी आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला . या ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांना डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, वि.स.खांडेकर, साने गुरुजी,पु.ल.देशपांडे, द.मा.मिरासदार आदी लेखकांची ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना अवलोकनासाठी ठेवण्यात आली होती . ग्रंथपाल गुरुप्रसाद पाटील यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाचे महत्त्व सांगितले . याबरोबरच त्यांनी मस्तक घडवण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा विश्वासू मित्र असू शकत नाही असेही सांगितले .
शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन वाचनाचा आनंद लुटला याबरोबरच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख पुस्तकातील वैज्ञानिक प्रसंगांचे अभिवाचन केले . या वाचनामध्ये पर्यवेक्षिका सरिता शिंदे मुख्याध्यापक संजय सौंदलगे बाळासाहेब कागले यांनी सहभाग घेतला . प्रास्ताविक संजित सनगर यांनी तर पल्लवी यादव यांनी आभार प्रदर्शन केले .
वाचन प्रेरणा दिनादिवशी विद्यार्थ्यांचे अभिवाचन ; पंत वालावलकर हायस्कूलचा उपक्रम
|