बातम्या
विद्या मंदिर वाटंगी येथे विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न
By Administrator - 12/1/2026 7:36:21 PM
Share This News:
वाटंगी (ता. आजरा) :- विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता, स्वावलंबन व व्यावहारिक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने विद्या मंदिर वाटंगी, ता. आजरा येथे विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा खाद्य महोत्सव आयोजित केला होता.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध चविष्ट व पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. पोहे, उपमा, वडापाव, भेळ, चॉकलेट, मिठाई, केक, चहा -बिस्कीट आदी पदार्थांनी उपस्थितांची मने जिंकली. पदार्थांची देवाण घेवाण करणे त्याचा हिशेब ठेवणे यातून त्यांनी व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला. यावेळी अनेक गमती जमती ही घडल्या . विद्यार्थ्यांनी पदार्थनिर्मितीपासून विक्री, स्वच्छता व आर्थिक नियोजनाची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
या उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व संघभावनेचे कौतुक करत असे उपक्रम विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुरवातीला श्रीमती रंजना हसुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला .
या खाद्य महोत्सवाला शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विश्वास कांबळे, पुंडलिक नाईक, अंकुश सुतार, संतोष बिरजे, अविनाश कांबळे, सौ. रेश्मा कसलकर , पल्लवी जाधव, छाया जाधव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन सौ. अनिता कुंभार श्रीम. अनुजा केने यांनी केले . तर मुख्याध्यापक श्री . सुनिल कामत यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
विद्या मंदिर वाटंगी येथे विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न
|