बातम्या
उत्तूर योग-निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी जगभरातून येतील विद्यार्थी – हसन मुश्रीफ
By nisha patil - 6/13/2025 9:44:33 PM
Share This News:
उत्तूर योग-निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी जगभरातून येतील विद्यार्थी – हसन मुश्रीफ
उत्तूर येथे महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बीएनवायएस पदवी अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, हे महाविद्यालय देशातील आघाडीचे केंद्र ठरेल. जगभरातील विद्यार्थी आणि रुग्ण येथे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या महाविद्यालयासाठी 205 कोटींचा निधी मंजूर असून, सुरुवातीची दोन वर्षे बहिरेवाडी येथे शिक्षण दिले जाईल. 60 विद्यार्थ्यांची क्षमता, हॉस्टेल, थेरपी सेंटर, डायट सेंटर, योग हॉल, स्विमिंग पूल, वाचनालय अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध असतील.
मुश्रीफ यांनी सीपीआर रुग्णालयाचे जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर नूतनीकरण होत असल्याचेही सांगितले. जिल्ह्यातच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. राजीव निवतकर, संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तूर योग-निसर्गोपचार महाविद्यालयात शिकण्यासाठी जगभरातून येतील विद्यार्थी – हसन मुश्रीफ
|