विशेष बातम्या
ट्रॅफिक गार्डन पाहून कोरगांवकर हायस्कूलचे विद्यार्थी सुखावले
By nisha patil - 7/23/2025 10:16:54 PM
Share This News:
ट्रॅफिक गार्डन पाहून कोरगांवकर हायस्कूलचे विद्यार्थी सुखावले
कोल्हापूर : बॉम्ब कसा शोधावा, तो कसा निकामी करावा, श्वान पथक कसे काम करते, शस्त्रांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला .
निमित्त होते पोलीस मुख्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या ट्रॅफिक गार्डनच्या भेटीचे विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक गार्डनला भेट देवून पोलीस अधिकाऱ्यांकडून जिज्ञासूपणे सर्वप्रकारची माहिती जाणून घेतली . श्वानपथकातील अधिकाऱ्यांनी श्वानाची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांना त्याच्या कौशल्याची जाणिव करून दिली . आर. एस.पी. विभागप्रमुख सुरेखा पोवार, शीतल गणेशाचार्य, विद्या बाचणकर, प्रसाद रेळेकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले .
ट्रॅफिक गार्डन पाहून कोरगांवकर हायस्कूलचे विद्यार्थी सुखावले
|