बातम्या
"व्हॅलेंटाईन डे दिवशी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीपीआर हॉस्पिटल परिसरात स्वच्छता केली"
By nisha patil - 2/14/2026 3:25:42 PM
Share This News:
"व्हॅलेंटाईन डे दिवशी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीपीआर हॉस्पिटल परिसरात स्वच्छता केली"
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज व्हॅलेंटाईन डे दिवशी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले. आपल्या खाजगी आयुष्यातील प्रेमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य ची जाणीव निर्माण व्हावी याच उदात्त हेतूने या स्वच्छता मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.
या स्वच्छता मोहिमेमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या स्वच्छते मोहिमेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली, सीपीआर मधील कामकाज पद्धती व सीपीआर मध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सीपीआर मधील सोयी सुविधांची माहिती विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात व परिसरातील लोकांना द्यावी असे सीपीआर च्या डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे (दादा) व प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी प्रोत्साहन दिले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विजय देठे व प्रा.संतोष कांबळे यांनी या स्वच्छता मोहिमेच्या सहभागाचे नियोजन केले.
"व्हॅलेंटाईन डे दिवशी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीपीआर हॉस्पिटल परिसरात स्वच्छता केली"
|