शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा: सपोनी स्वाती यादव
By nisha patil - 6/1/2026 2:54:34 PM
Share This News:
कोल्हापूर :विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळावा, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून संयमी पणे वाटचाल करावी असे आवाहन कोल्हापूर
महिला दक्षता समिती व शहर निर्भया पथक एसपी ऑफिस कोल्हापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समितीमार्फत सोशल मीडिया व स्त्री सुरक्षा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्यात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
मान्यवरांच्या हस्ते अँटी रॅंगिग वरील भित्तिपत्रकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. एस. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. ए. डी. पाटील यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ. एस.आर.कांबळे यांनी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा: सपोनी स्वाती यादव
|