बातम्या
“विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण ज्ञान आत्मसात करून करिअर घडवावे” — सौ. अरुंधती महाडिक; विवेकानंद कॉलेजमध्ये एज्युकेशन फेअर संपन्न
By nisha patil - 11/22/2025 3:36:12 PM
Share This News:
“विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण ज्ञान आत्मसात करून करिअर घडवावे” — सौ. अरुंधती महाडिक; विवेकानंद कॉलेजमध्ये एज्युकेशन फेअर संपन्न
विवेकानंद ज्युनिअर कॉलेज आयोजित एज्युकेशन फेअर कार्यक्रमात बोलताना भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचा समन्वय साधत कौशल्यपूर्ण शिक्षण आत्मसात करावे, असे सांगितले.
आजच्या युगात उद्योग, व्यवसाय, सेवा अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, अनुभव व चिंतन यांचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी केले. कला-वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एज्युकेशन फेअरचे आयोजन केले जाते, यामुळे नृत्य, संगीत, अभिनय आणि सर्जनशीलतेचा विकास होतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थना व रोपाला पाणी घालून झाली. आभार प्रा. बी. एस. कोळी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला कला आणि वाणिज्य विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रार एस. के. धनवडे आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
“विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण ज्ञान आत्मसात करून करिअर घडवावे” — सौ. अरुंधती महाडिक; विवेकानंद कॉलेजमध्ये एज्युकेशन फेअर संपन्न
|