बातम्या
“विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” – मा. जयसिंगराव सावंत
By nisha patil - 4/9/2025 5:27:43 PM
Share This News:
“विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” – मा. जयसिंगराव सावंत
कोल्हापूर, दि. 4 : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते मा. जयसिंगराव सावंत यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त “संस्थामाता : प्रेरणादायी जीवनप्रवास” या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानाहून मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे म्हणाले, “संस्थामाता हा गुरुदेव कार्यकर्त्यांनी दिलेला सन्मान आहे. शिस्तप्रिय, त्यागमय जीवन जगणाऱ्या सुशीलादेवी साळुंखे विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त माया करत असत. स्त्रीवाद समजून घ्यायचा असेल तर संस्थामातांना समजून घेणे गरजेचे आहे.”
या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आयुर्वेद ॲण्ड हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्यावतीने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, रोपाला पाणी घालणे आणि संस्था प्रार्थनेने झाली. स्वागत प्रा. सौ. शिल्पा भोसले यांनी केले, आभार प्रा. गीतांजली साळुंखे यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार, डॉ. संपदा टिपकुर्ले, डॉ. श्रुती जोशी, डॉ. कविता तिवडे, प्रा. पल्लवी देसाई, श्री. एस. के. धनवडे, ज्युनिअर व सिनिअर कॉलेज स्टाफ सेक्रेटरी तसेच प्राध्यापक, प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” – मा. जयसिंगराव सावंत
|