शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी ‘दीनदयाल स्पर्श’ योजनेचा लाभ घ्यावा
By nisha patil - 8/28/2025 5:52:10 PM
Share This News:
विद्यार्थ्यांनी ‘दीनदयाल स्पर्श’ योजनेचा लाभ घ्यावा
कोल्हापूर, दि. 28: देशातील टपाल सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा अभिन्न भाग असून, टपाल खात्याने नवनवीन योजना राबवून ग्राहकसंख्या वाढवली आहे. विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासाठी आणि त्यांना इतिहासाची माहिती करून देण्यासाठी ‘दीनदयाल स्पर्श योजना’ राबवण्यात येत आहे.
६ वी ते ९ वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी टपाल तिकिट संग्रह खाते योजना (फिलॅटेली डिपॉझिट योजना) सुरु केली असून, विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद वाढावा हा यामागील उद्देश आहे.
📌 महत्वाच्या तारखा:
प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, अशी माहिती कोल्हापूरचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
📌 शिष्यवृत्तीचे स्वरूप:
-
अखिल भारतीय स्तरावर ९२० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
-
प्रत्येक सर्कलमधून जास्तीत जास्त ४० विद्यार्थी (६ वी ते ९ वी मधील प्रत्येकी १० विद्यार्थी)
-
शिष्यवृत्ती : ₹५०० प्रतिमहिना (एकूण ₹६,०००)
📌 अर्हता:
-
मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा
-
वार्षिक परीक्षेत किमान ६०% गुण (अजा/अज प्रवर्गासाठी ५५%)
-
शाळेत फिलॅटेली क्लब असावा आणि विद्यार्थी सदस्य असावा.
-
शाळेत क्लब नसेल तर स्वतंत्र टपाल तिकिट संग्रह खाते असावे.
📌 निवड प्रक्रिया:
📌 इतर नियम:
-
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबत पोस्ट ऑफिस बचत बँक (POSB) किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) चे संयुक्त खाते उघडणे आवश्यक
-
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाईल.
👉 विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टपाल तिकिट संग्रहाचा छंद जोपासावा आणि शैक्षणिक व ऐतिहासिक ज्ञान वृद्धिंगत करावे.
विद्यार्थ्यांनी ‘दीनदयाल स्पर्श’ योजनेचा लाभ घ्यावा
|