बातम्या
श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्साह; एनएसएसमुळे जमिनीशी नाळ घट्ट – प्रा. प्रमोद पाटील
By nisha patil - 4/14/2025 3:39:32 PM
Share This News:
वळीवडे : श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्साह; एनएसएसमुळे जमिनीशी नाळ घट्ट – प्रा. प्रमोद पाटील
वळीवडे (ता. करवीर) येथे डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे आयोजित पाच दिवसीय एनएसएस श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात शुभारंभ झाला.
प्रा. प्रमोद पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले की, “एनएसएसमुळे विद्यार्थ्यांची जमिनीशी नाळ घट्ट होते. सेवावृत्ती आणि समाजप्रती जबाबदारीची भावना वृद्धिंगत होते.”
या शिबिरात आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहिम, महिला सक्षमीकरण कार्यशाळा, स्किट, चित्रकला, योग, संगणक साक्षरता, रांगोळी आदी उपक्रम राबवण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, सरपंच रूपाली कुसाळे, डॉ. अजित पाटील, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अद्वैत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सौ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. निखील नाईकवाडे, अक्षय भोसले, रोहन बुचडे यांनी परिश्रम घेतले.
श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्साह; एनएसएसमुळे जमिनीशी नाळ घट्ट – प्रा. प्रमोद पाटील
|