बातम्या
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ CFC, ग्रंथालय आणि नॅनोटेक्नॉलॉजी विभागास अभ्यास भेट
By nisha patil - 12/9/2026 3:25:05 PM
Share This News:
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ CFC, ग्रंथालय आणि नॅनोटेक्नॉलॉजी विभागास अभ्यास भेट
कोल्हापूर दि. 12 : येथील विवेकानंद कॉलेज, मधील रसायनशास्त्राच्या एम एस्सी (Organic & Analytical) विभागातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अभ्यासभेट देऊन विविध शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच करिअरविषयक संधींची माहिती जाणून घेतली.
या अभ्यासभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी CFC सेंटर, शिवाजी विद्यापीठाचे ग्रंथालय तसेच नॅनोटेक्नॉलॉजी विभागास भेट दिली. विद्यार्थ्यांनी विविध अत्याधुनिक उपकरणे, संशोधन सुविधा, सुरू असलेले संशोधनकार्य तसेच ग्रंथालयातील संदर्भग्रंथ व शैक्षणिक साहित्य यांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी या भेटीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांबाबत जिज्ञासेने प्रश्न विचारले. या अभ्यासभेटीमुळे विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील आधुनिक संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणांचा वापर, उच्च शिक्षण आणि भविष्यातील विविध करिअरच्या संधींबाबत प्रत्यक्ष अनुभव व मौल्यवान माहिती मिळाली.
CFC सेंटरचे संचालक प्रा. डॉ. यादव, शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयातील ग्रंथपाल डॉ. सुतार तसेच नॅनोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ. डोंगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध अत्याधुनिक उपकरणे, संशोधन क्षेत्रे, उच्च शिक्षणाच्या संधी तसेच कौशल्यविकासातून उपलब्ध होणाऱ्या रोजगार व करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान विद्यापीठाचे IQAC समन्वयक डॉ डेळेकर, तसेच विद्यापीठातील स्नेहल भोसले, कुंभार मॅडम आणि अमृता पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करून अभ्यासभेट यशस्वी होण्यासाठी मोलाची मदत केली.
या अभ्यासभेटीचे आयोजन विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या रसायनशास्त्र विभागामार्फत करण्यात आले. अभ्यासभेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डॉ. सी. बी. पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. शिर्के, पदव्युत्तर विभागाचे समन्वयक डॉ. अर्जुन कुंभार व डॉ. अजय अंभोरे, तसेच प्रा. विजया राजमाने, प्रा. पूनम नरंदे आणि तानाजी भुसनूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ CFC, ग्रंथालय आणि नॅनोटेक्नॉलॉजी विभागास अभ्यास भेट
|