शैक्षणिक
सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजही प्रेरणादायी: प्रा.रामकृष्ण शेणेकर
By nisha patil - 1/25/2026 11:51:04 AM
Share This News:
सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजही प्रेरणादायी: प्रा.रामकृष्ण शेणेकर
कोल्हापूर: इतिहास विभाग, NCC विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त "सुभाषचंद्र बोस: आजच्या संदर्भात..." या विषयावर विशेष व्याख्यान व विद्यार्थी मनोगत कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थी मनोगत! वंदना कात्रूट, फातीमा सय्यद, समीक्षा माने आणि सोमेश कांबळे या विद्यार्थ्यांनी नेताजींचे विचार आजच्या युगात कसे प्रासंगिक आहेत, यावर अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी मते मांडली.
इतिहास विभागातील प्रा. रामकृष्ण शेणेकर यांनी आपल्या व्याख्यानातून नेताजींची ध्येयधोरणे आणि त्यांचे कार्य आजच्या संदर्भात समजून घेताना युवकांनी कोणती भूमिका घ्यावी, यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथपाल डॉ. पी. बी. पाटील सर होते. या उपक्रमाला संस्थेचे चेअरमन मा. मानसिंग बोंद्रे (दादा) व प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे मोलाचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी डॉ. आर. डी. मांडनीकर, डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इतिहास विभागातील डॉ. एस. व्ही. शिखरे, डॉ. एस. डी. रायजादे, डॉ. पी. आर. भुयेकर आणि प्रा. आर. एस. शेणेकर यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी आणि शिस्तबद्ध NCC कॅडेट्स मुळे कार्यक्रमात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली होती.
सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजही प्रेरणादायी: प्रा.रामकृष्ण शेणेकर
|