ताज्या बातम्या
पोटहिस्सा मोजणी आता फक्त २०० रुपयात; ९० दिवसांत प्रक्रिया पूर्ण
By nisha patil - 8/12/2025 2:11:37 PM
Share This News:
राज्यातील शेतकरी व नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील पोटहिस्सा मोजणी (वडिलोपार्जित मालमत्ता वाटप) आता केवळ २०० रुपयांत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ९० दिवसांच्या आत पूर्ण केली जाणार असून शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
पोटहिस्सा मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्व सदस्यांची लेखी संमती देणे बंधनकारक असेल. यामुळे प्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी पोटहिस्सा मोजणीसाठी १,००० ते १४,००० रुपयांपर्यंत खर्च येत होता. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत होता. आता ही रक्कम फक्त २०० रुपयांवर आणण्यात आल्याने नागरिकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
शासनाचा हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना यातून मोठा फायदा होणार आहे.
पोटहिस्सा मोजणी आता फक्त २०० रुपयात; ९० दिवसांत प्रक्रिया पूर्ण
|