बातम्या
फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात वालावलकर हायस्कूलच्या अवधुत धुमाळ चे यश
By nisha patil - 10/26/2026 1:51:11 PM
Share This News:
फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात वालावलकर हायस्कूलच्या अवधुत धुमाळ चे यश
कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शांताराम पंत वालावलकर हायस्कूलचा विद्यार्थी अवधूत अविनाश धुमाळ याने ६६ किलो वजनीगटात आणि चौदा वर्षाखालील वयोगटात मॅटवरील फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात प्रतिस्पर्ध्यावर मात करीत गुणांवर आधारित तृतीय क्रमांक पटकावला .
त्याला शाळेचे क्रीडाशिक्षक समीर जमादार, राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, सागर वाडकर यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सरीता शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले . यश संपादन करणाऱ्या अवधुतचे तसेच मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे शालेय समिती चेअरमन संजीवभाई परीख तसेच संस्थेचे माजी सचिव एम.एस. पाटोळे यांनी अभिनंदन केले .
फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात वालावलकर हायस्कूलच्या अवधुत धुमाळ चे यश
|