बातम्या
आविष्कार संशोधन स्पर्धेत विवेकानंद कॉलेजचे सुयश
By nisha patil - 10/27/2026 3:08:05 PM
Share This News:
आविष्कार संशोधन स्पर्धेत विवेकानंद कॉलेजचे सुयश
कोल्हापूर, दि. 27 : शिवाजी विद्यापीठ आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत जिल्हा स्तरीय स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या कु. छवी यादव (बी एस्सी भाग 3 बायोटेक्नॉलॉजी) या विद्यार्थिनीचा ॲग्रीकल्चर या विभागातून तृतीय क्रमांक व विद्यापीठस्तरीय आंतरजिल्हा स्पर्धेत चौथा क्रमांक आला. तसेच विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत पदव्युतर विभागात कु.ईश्वरी पोळ (एम.एस्सी.भाग 2 बायोटेक्नॉलॉजी) या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला. सदरच्या स्पर्धा अनुक्रमे कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेशनल व्होकेशन कोर्सेस फॉर वुमेन (सायबर) व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडल्या.
या संशोधन प्रकल्पासाठी अविष्कार स्पर्धा समन्वयक डॉ. अस्मिता तपासे, डॉ. सलमा मुल्ला, प्रा श्रीहरी कुलकर्णी, प्रा आशुतोष उपाध्ये, प्रा.अमेय पाटील, प्रा.सचिन कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डॉ.सी.बी.पाटील, , आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. बी.टी.दांगट यांनी अभिनंदन केले.
आविष्कार संशोधन स्पर्धेत विवेकानंद कॉलेजचे सुयश
|