बातम्या
*संघटना आणि जनतेच्या लढ्याला यश -उत्तूर बसस्थानकाचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश
By nisha patil - 9/19/2026 8:05:35 PM
Share This News:
*संघटना आणि जनतेच्या लढ्याला यश -उत्तूर बसस्थानकाचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश
*आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील उत्तूर व परिसरातील जवळपास 40 गावांना मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उत्तूर बस स्थानकाचे बांधकाम मागील दीड वर्षापासून बंद पडले होते. त्यामुळे सदर बांधकामाचे स्टील (सळ्या) पावसात पडून गंजत होत्या. पुढे बांधकामास धोका होता. बसस्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघटनेने दहा दिवस धरणे व हलगीनाद आंदोलन केले होते. याला उत्तूर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि उत्तूरच्या लोकांनीही साथ दिली होती. अखेर या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले व उत्तूर बसस्थानकाचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षतेखाली शाहुजी सभागृह जिल्हाधिकारी, कोल्हापूर कार्यालय येथे ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कोल्हापूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर दक्षिण, विभाग नियंत्रक राष्ट्रीय परिवहन कोल्हापूर, तहसीलदार महसूल आजरा, सरपंच ग्रामपंचायत उत्तूर तसेच उत्तूर विभागातील ग्रामस्थ व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*आमच्या चॅनेलने आंदोलनाचे सातत्यपूर्वक व नियमित वार्तांकन केले होते आणि वाचा फोडली होती
*संघटना आणि जनतेच्या लढ्याला यश -उत्तूर बसस्थानकाचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश
|